- चिंचवड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२१) :- अल्पवयीन मुलीने तिचे फोटो इंस्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे फिर्यादी मुलीला रागावल्या. त्या कारणावरून मुलगी बुधवारी (दि. १५) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरातून निघून गेली.
ती रात्री उशिरापर्यंत घरी परत आली नाही. फिर्यादी यांच्या मुलीला अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा फिर्यादी यांना संशय आहे.
त्याबाबत त्यांनी अपहरणाची फिर्याद दिली आहे. ४९ वर्षीय आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
















