न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२१) :- पिस्तुल बाळगण्याचा परवाना नसतानाही आरोपीने त्याच्या कब्जात बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगले. याबाबत वाकड पोलिसांना बुधवारी (दि. १५) सायंकाळी सव्वापाच वाजता माहिती मिळाली असता पोलिसांनी थेरगाव येथे बारणे कॉर्नर, प्रसुधान सोसायटी रोडवर सापळा लावला.
आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २२ हजारांचे एक गावठी लोखंडी पिस्टल आणि एक जिवंत कडतुस जप्त केले. पोलीस हवालदार व्ही टी गंभीरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
समीर रफिक अन्सारी (वय २६, रा. बोराडेनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वाकड पोलीस याप्रकऱणी तपास करीत आहेत.
















