न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जाने.) :- निगडी येथील दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी- चिंचवड शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्ष सीए आमोद भाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आयसीएआयच्या विद्यार्थी संघटना अध्यक्ष सीए युवराज तावरे, सचिव/ खजिनदार प्राजक्ता चिंचोळकर, कार्यकारी सदस्य सीए संतोष संचेती, माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी, सीए बबन डांगले, सीए प्रसाद सराफ, सीए सचिन बंसल, सीए विजय बामणे, सीए केतन गरिबे, कार्तिक गोलांडे महेंद्र बोराडे, सीए शैलेश बोरे, सीए विनोद संचेती, भारत पटेल, संतोष वालसांगकर, मंदार देशपांडे, सीए सिमरन लिलावाणी, सीए सुकन्या सिंग, ऋषिकेश चिंचोळकर, सीए सौरभ महागांवकर आदी उपस्थित होते.















