न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जाने.) :- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये स्वतंत्र भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्यां च्या हस्ते तिरंगा फडकावला गेला आणि त्यानंतर राष्ट्रगीत गायन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल पाटील, मिलींन खडके उपस्थित होते. यावेळी पालक अतिथि उपस्थित सुरेश जाधव, रेश्मा मूलमाने, वैशाली पाटील, मोनाली खडके आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यानी मार्गदर्शनपर भाषणे केली.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी बहारदार नृत्य सादर करून, सर्वांची वाहवा मिळवली. याप्रसंगी शाळेचे संस्थापक संदीप काटे, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, शाळेच्या समन्यवयक रजनी घुगे, पूर्व प्राथमिक विभाग समन्यवयक पलक गांधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे खाऊ वाटप करण्यात आला.











