न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जाने.) :- निगडी येथील सच्चिदानंद एज्युकेशन ट्रस्ट संचलित विद्यानंद भवन हायस्कुल मध्ये ७० वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून विजय मॅसकॅरिनस (कॅनडा) उपस्थित होते.
संस्था अध्यक्ष भरत चव्हाण पाटील, श्वेता चव्हाण पाटील, विश्वस्त डॉ. जे. जी. पाटील, फिओना फर्नांडिस, मुख्याध्यापिका छाया हब्बू, सविता किरंगे, प्रीती शिंदे व बहुसंख्य पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
देशभक्ती चे संस्कार लहान वयातच होतात, शाळा हे त्याचे माध्यम आहे, असे विचार विजय मॅस्कारेन्हास यांनी मांडले. ध्वजारोहण नंतर शाळेच्या मिलिटरी कमांडो फोर्सच्या छोट्या जवानांनी अप्रतिम संचलन सादर केले. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर नृत्ये, नाट्य सादर केले. माध्यमिकच्या शिक्षकांनी देशभक्ती पर गीते गायली.
यावेळी वेगवेगळ्या स्तरावरील यश प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक साहेबराव जाधव, शीतल म्हात्रे, योगेश जाधव यांनी केले. सूत्रसंचालन तेजस्विनी धारगळकर यांनी केले.











