- चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२१) :- नागसेननगर झोपडपट्टी येथे बुधवारी (दि. १५) दुपारी कामानिमित्त गेलेल्या इसमाला आरोपीने ‘तू आप्पा कसबेसाठी काम करतो का?’ असे म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर त्याच्याकडे असलेला चाकू काढून त्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. किरण रमेश सौंदरकर (वय ३०, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश गायकवाड (रा. नागसेननगर झोपडपट्टी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
















