- धडकेत जागीच मृत्यू; वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२१) :- वाकडच्या विशालनगर येथे गुरुवारी (दि. १६) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ हे (एमएच १४ बीडी ३४१८) दुचाकीवरून चालले होते.
वाय जंक्शन जवळ आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
शेखर महादेव गव्हाणे (वय ४८) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांचा भाऊ शंतनु महादेव गव्हाणे (वय ५१, रा. धनकवडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















