- महिला व बालकल्याण सभापती सविता खुळे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२१) :- रहाटणी प्रभाग क्र. २७ मध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असून अनेक विकासकामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. याची गंभीर दखल घेत महिला व बालकल्याण सभापती सौ. सविता बाळकृष्ण खुळे यांनी गुरुवारी तातडीने महापालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रभागातील सुरु असलेल्या कामांची पाहणी केली.
पाहणीदरम्यान विकासकामांसंदर्भात अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. तसेच ही सर्व विकासकामे आगामी महानगरपालिका निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी कार्यकारी अभियंता गट्टूवार, उप अभियंता तावरे, कनिष्ठ अभियंता कलाल, सुपरवायजर वाघेरे आदी अधिकारी उपस्थित होते. सभापती सविता बाळकृष्ण खुळे यांच्या सूचनेनंतर लवकरात लवकर प्रभागातील सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना दिले.
















