- विजेची उधळपट्टी थांबविण्याची नागरिकांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२१) :- चिंचवडगाव ते बिजलीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजेचे दिवे अनेकदा दिवसभर चालूच असतात. त्यामुळे हजारो युनीट वीज वाया जात आहे.
विजेची बचत करण्याऐवजी ही उधळपट्टी म्हणजे राष्ट्रीय हानीच आहे. महापालिकेने याची दखल घेऊन असे प्रकार टाळले पाहिजेत. संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
















