- वेश्या व्यवसाय प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२१) :- वाकड येथे ब्लॉझम सलून येथे पैशांचे आमिष दाखवून आरोपींनी पाच पीडित महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी (दि. १७) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास कारवाई करून पीडित महिलांची सुटका केली.
आरोपीने त्याच्या नावावर असलेली जागा कोणतेही ॲग्रीमेंट न करता दोघा आरोपींना उपलब्ध करून दिली. त्यांनी या जागेवर स्पा सेंटर च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू केला. सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलीस कर्मचारी सोनाली माने यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
स्पा सेंटरचा चालक-मालक सचिन सुरेश भिसे (वय ३३, रा. शिराढोण, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), स्पा सेंटरची मॅनेजर मोहिनी फुलचंद घुगे/ मोहिनी लहू सोनवणे (वय २५, रा. रहाटणी), अभय मारुतीराव छिद्री (वय ४०, रा. रहाटणी, काळेवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.