- कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील रक्कम घेऊन दोघांचा पोबारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२१) :- जुनी सांगवी येथील एम यु शितोळे नावाच्या देशी दारू बार व बियर शॉपीमध्ये शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान दोन अनोळखी आरोपी त्यांच्या दुकानात आले.
एकाने फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करून मारहाण केली. दुस-याने दुकानाच्या काउंटरमधून दिवसभर जमा झालेली सुमारे ३५ हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपी पायी पळून गेले.
बबन रामराव खराटे (वय २६, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.