- गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२१) :- रहाटणीच्या कोकणे चौकात चौपाटीवर दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे पिस्तुल आहे, अशी माहिती गस्तीवरील पोलिसांना रविवारी (दि. १९) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करीत दोघांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलीस शिपाई विनायक घारगे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अजित रामलखन यादव (वय २५, रा. काळेवाडी. मूळ रा. मध्य प्रदेश), हिमाचल अतरसिंग रावत (वय २४, रा. काळेवाडी, मूळ रा. मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















