न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. २७ जाने.) :- शिवसेनेचे माजी नगरसेवक संपत पवार यांचा मुलगा कुणाल संपत पवार (वय २०, रा. पवार नगर, सूर्यमुखी दत्त मंदिर चौक, थेरगाव) यास मारहाण झाली असून, त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
कुणाल यांचा भाऊ कुंदन आणि त्याचा मित्र या दोघांना काहीजण जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण करत होते. त्यावेळी फिर्यादी कुणाल यांनी आरोपींना मारहाण का करत आहात?, अशी विचारणा केली. त्यावरून आरोपींनी कुणाल यांच्या डोक्यावर लोखंडी कोयत्याने वार केले.
कुणाल संपत पवार याने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी भिलारे (रा. थेरगाव) आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.











