न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २७ जाने.) :- मोशी-प्राधिकरण येथील गॅलक्सी किड्स प्री. प्रायमरी स्कूलमध्ये शनिवार (दि. २६) रोजी प्रजासत्ताक दिन धूम-धडाक्यात साजरा करण्यात आला. शाळेतील चिमुकल्यांनी सैनिक परेड सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या पालकांसह रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदवला व एकतेचे प्रतिक दर्शिविले. यावेळी शाळेचे संस्थापक जनार्धन्न, मुख्याध्यापिका माधवी जनार्धन्न, विद्यार्थी, पालक व शाळेच्या शिक्षिका आदी उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका माधवी जनार्धन्न मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, चिमुकल्यांच्या प्रदर्शनाचा आभिमान वाटतो. माझ्या शाळेतील १० टक्के मुले जरी सैनिकी दलात भरती झाले तरी, मला व शाळेला त्यांचा अभिमान असेल व हीच गुरुदक्षिणा असेल. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.











