न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२१) :- कर्नाटक बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा निषेध पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान असून आमच्या प्रेरणास्थानाची विटंबना ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे, अशी भावना भाजपा युवा मोर्चाकडून व्यक्त करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कर्नाटक बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, शहराध्यक्ष संकेत चोंधे, निलेश यादव, दीपक नागरगोजे आदी उपस्थित होते.