- आरसीसी, वीट बांधकामं, पत्राशेड अशी बारा बांधकामं भुईसपाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ४ दिघी येथे गुरुवार (दि. २३) रोजी अनधिकृत बांधकामांवर पाडापाडीची कारवाई केली.
या कारवाईत १२ अनधिकृत बांधकामे यात आरसीसी, वीट बांधकामे, पत्राशेड अशी अंदाजे ७८११.७६ चौरस फुट क्षेत्रफळाच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
अति. आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली इ क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता हेमंत देसाई यांच्यासह पालिकेचे पथक व पोलिसांनी ही कारवाई केली.