- दापोडीतील सिद्धार्थनगरमधून एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२१) :- अवैधरित्या आरोपीने विनापरवाना कुकरी चाकू हे शस्र जवळ बाळगणे आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दापोडीतील सिद्धार्थनगर येथे रविवारी (दि. २६) रोजी आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून १०० रुपये किमतीचा कुकरी चाकू जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. २६) रात्री सिद्धार्थनगर, दापोडी येथे करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल स्वामी नरवडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओमकार सोमनाथ गायकवाड (वय २०, रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार खरात तपास करीत आहेत.