- प्रभागातील ‘खेळ रंगला पैठणीचा’ आला अंगलट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२१) :- कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजना केले. याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकासह दोघांवर गुन्हा दाखल केला. पिंपळे गुरव येथे सोमवारी (दि. २७) हा प्रकार घडला.
त्यानुसार नगरसेवक सागर सुनील आंघोळकर आणि प्रतिभा महिला पतसंस्थेच्या उपाध्यक्ष शोभा नवनाथ जांभुळकर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार तुषार साळुंखे (वय ३६) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गर्दी करण्यास मनाई आहे. वेळेचे बंधनही प्रशासनाने घालून दिले आहे. या सर्व परिस्थितीची जाणीव असतानाही आंघोळकर आणि जांभुळकर यांनी प्रभागात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. आपत्ती व्यवस्थापन पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
















