- आज ८३ कोरोनाबाधित; ६८ डिस्चार्ज, एकाचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २९) रोजी ८३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २७८९०६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७४६७५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५२५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.
दरम्यान आज ओमायक्राँनचे ४ नवीन रुग्ण आढळलेले आहेत. २ महिला, १ पुरुष व एक लहान मुलाचा समावेश आहे. ४ पैकी १ रुग्ण थायलंड, १ रुग्ण जपान, १ रुग्ण दक्षिण आफ्रिका येथुन आलेले आहेत व १ रुग्ण रँन्डम तपासणीत ओमायक्राँन पाँझीटिव्ह आलेला आहे. सर्व रुग्ण नवीन भोसरी रुग्णालय येथे दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.