न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२१) :- गाडीचा मूळ सायलेन्सर काढून खास नव्याने तयार केलेला विशिष्ट सायलेन्सर बसवून वेगात बुलेट चालवत कर्णकर्कश्श आवाजासह सायलन्सरमधून फटाक्यासारखे आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर वाकड वाहतूक विभागाने कारवाई केली.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात सध्या बेशिस्त बुलेट चालकांवर कारवाई सुरू आहे. वाकड हद्दीत मागील तीन दिवसात तब्बल पंचवीस बेशिस्त बुलेट चालकावर कारवाई करण्यात आली. कारवाईत प्रत्येकी एक हजाराच्या दंडासह गाडीचे विशिष्ट सायलेन्सर जप्त करण्यात आले.
नियमबाह्य बुलेट चालकांवर मागील तीन दिवसांपासून कडक कारवाई सुरु आहे. पुढेही आक्रमकपणे कारवाई सुरूच राहील. कोणाचीही गय केली जाणार नाही. – संदीप जमदाडे (सहायक पोलीस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग)…
















