- भोसरी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- संगनमत करीत आरोपींनी एकाला सायकलवर बसवून लांब नेले. तिथे त्यांना मारहाण करून त्यांचा खून केला. जुन्या भांडणाच्या कारणातून हा खून केल्याचं फिर्यादीत म्हटले आहे.
बबन बाबासाहेब केंगार असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. थरमॅक्स चौक, निगडी ते खडी मशीन रोड, मोशी या दरम्यान २९ ते ३० डिसेंबर रोजी हा प्रकार घडला आहे.
३५ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. ३१) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर अनिल सरोदे, गौरव सरोदे, अनिल सरोदे व त्यांच्या इतर मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.