न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- कोव्हिड-१९ बाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमायक्राँन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित (Mutated) विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केलेले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना सदृश लक्षणे आढळून येणा-या आणि तापाच्या सर्व रुग्णांची RTPCR व Rapid Antigen Test चाचणी करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरामधील खाजगी रुग्णालयामध्ये व फिवर क्लिनिक मधून संदर्भीत केलेल्या रुग्णांची RTPCR तपासणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या केंद्रावर मोफत स्वरुपात करण्यात येणार असून या कामी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोशिएशन (IMA), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (NIMA), पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशन (PCDA) आणि सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांना पालिकेने आवाहन केले आहे.
पिं.चिं.म.न.पा. क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायीकांनी त्यांचेकडील रुग्ण हे मोफत RTPCR चाचणी करिता संदर्भीत करावेत अथवा त्यांचे रुग्णांचे घशातील द्रावाचा नमुना पिं.चिं.म.नपा.चे आठ झोनल रुग्णालयामार्फत कार्यरत खालील RTPCR चाचणी केंद्र येथे पाठवावा. घशातील द्रावाचा नमुना घेणेकामी खाजगी वैद्यकिय व्यवसायिक यांना साहित्य आणि सामुग्री पिं.चिं.म.नपा.चे आठ झोनल रुग्णालयामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्यात येईल.
RTPCR व Rapid Antigen Test चाचणी केंद्र…
कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, जुने आकुर्डी रुग्णालय, आकुर्डी, आर.टी.टी.सी सेंटर शाहुनगर, साई अंब्रेला, संभाजीनगर दवाखाना,यमुनानगर रुग्णालय, म्हेत्रेवस्ती दवाखाना, रुपीनगर दवाखाना, तळवडे दवाखाना, तालेरा रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड, ओजस हॉस्पीटल, पुनावळे, भोंडवे कॉर्नर, रावेत, गावडे पेट्रोल पंप, चिंचवड, जिजामाता रुग्णालय – जुने जिजामाता रुग्णालय, पिंपरी, नवीन जिजामाता रुग्णालय, पिंपरी, पिंपळे सौदागर दवाखाना, कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, थेरगांव रुग्णालय खिवंसरा पाटील रुग्णालय, थेरगाव, नवीन थेरगांव रुग्णालय, थेरगांव, सांगवी रुग्णालय इंदिरा गांधी प्रसुती गृह, जुनी सांगवी, बडमिंटन हॉल काटेपुरम चौक, पिंपळे गुरव भोसरी रुग्णालय जुने भोसरी रुग्णालय, मोशी दवाखाना, वाय.सी.एम.रुग्णालय, खराळवाडी दवाखाना.
या अनुषंगाने पालिकेने खाजगी रुग्णालय व फिवर क्लिनिक (खाजगी दवाखाने) या मधून संदर्भीत केलेल्या रुग्णांचे आणि RTPCR नमुन्यांची तपासणी पिं.चिं.म.न.पा.चे वाय.सी.एम.एच. व नवीन भोसरी रुग्णालय येथील RTPCR लॅबमधून करुन घेण्यासाठी सर्व झोनल रुग्णालय प्रमुखांना सुचित करण्यात आलेले आहे.















