- कोरोनाचे आज ११२ रुग्ण; ११० डिस्चार्ज, एकही मृत्यू नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १) रोजी ११२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ११० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २७९२४८ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७४९८९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५२६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.
दरम्यान आज ओमायक्राँनचे २ नवीन रुग्ण आढळलेले आहेत. २ पैकी २ महिला असुन त्यांचे वय वर्षे २२ व २३ इतके आहे. या महिला रँन्डम तपासणीमध्ये ओमायक्राँन पाँझीटिव्ह आढळून आलेल्या आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असुन त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
एकूण ६९ कोविड १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ४७ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.















