- मोशीतील घटना; कामगारावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२१) :- मोशीतील खदान खडी मशीन येथील श्री एसेस स्ट्रक्चरल अॅण्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फिर्यादी नोकरी करतात. आरोपी देखील तिथे काम करतो. आरोपीला त्याच्या सुपरवायझरने दोन महिन्यांचा पगार दिला नाही.
या रागातून त्याने फिर्यादी यांच्या प्लांटमध्ये पार्क केलेले सात डंपर, तीन मिक्सर, एक स्प्रे बाउजर, दोन टेम्पो व एक जनरेटर व्हॅन अशा एकूण १४ वाहनांची तोडफोड केली. तसेच एका टेम्पोची दगडाने तोडफोड करून आग लावली. ही घटना शुक्रवारी (दि. ३१) रात्री दहा ते शनिवारी (दि. १) सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
श्रवणकुमार सत्यनारायण शहा (वय ४४, रा. विठ्ठलनगर, देहू) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवम उपाध्याय (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी कामगाराचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक पुजारीही तपास करीत आहेत.















