न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२१) :- जनतेच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलिसांचा महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिनानिमीत पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाणे, साने चौक पोलीस चौकी, चिचवड, थरमॉक्स चौक येथील पोलिसांचा शिवसेनेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शहर शिवसेना प्रणीत महाराष्ट्र वितरक सेना जिल्हा सरचिटणीस वैभव विक्रम छाजेड, शिवसेना मोरेवस्ती चिखली उपविभाग प्रमुख संजय गाढवे, कुशल, खुशी छाजेड उपस्थित होते. सन्मानामुळे पोलीस भारावून गेले होते. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.















