- आत्महत्येचे कारण अस्पष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२१) :- चिखलीतील पाटीलनगर येथील वृंदावन कॉलनी येथे २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना आज सोमवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. ऍडवीन विमल असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत