न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२१) :- सुदर्शननगर येथे रस्त्यावर पार्क केलेल्या फिर्यादीच्या कारची आरोपीने दारूच्या नशेत तोडफोड केली. फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन राडा घातला. कृष्ण प्रकाश साहेब मला न्याय द्या, असे म्हणत त्याने आरडाओरडा केला.
अमित रामचंद्र गावडे (वय २८, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विश्वनाथ साठे मोहित भोसले (दोघे रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.