न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२१) :- संभाजी ब्रिगेडची वाशीम येथे मंगळवार (दि. ४) रोजी राज्य कार्यकारिणी संचालक मंडळाची वार्षिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
यावेळी सर्वानुमते स़ंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सतिश काळे यांची पिंपरी चिंचवड महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सतिश काळे संभाजी ब्रिगेडचे गेल्या पंधरा वर्षांपासून पासून काम करत आहेत. काळे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. सतिश काळे यांची पिंपरी चिंचवड शहरात पुरोगामी विचारांचा लढाऊ व आक्रमक मावळा म्हणून ओळख आहे. समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


















