- चिखली घरकुलमध्ये कोविड केअर सेंटर सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२१) :- ‘ओमायक्रॉन’ (Omicron)’ या विषाणूमुळे येऊ घातलेली तिसरी लाट थोपविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने सात रुग्णालये सज्ज केली आहेत. तसेच गरजेनुसार कोविड केअर सेंटरर्स (CCC) सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यानुसार घरकुल, चिखली येथील B-10 बिल्डींगध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आलेले आहे व टप्प्याटप्प्याने इतर कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येतील.
नागरिकांनी कोविडची लक्षणे आढळल्यास त्वरीत टेस्टिंग करुन घ्यावे. पालिकेच्या ८ झोनल रुग्णालयामध्ये (भोसरी रुग्णालय, सांगवी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय, तालेरा रुग्णालय व यमुनानगर रुग्णालय) टेस्टिंगची सोय मोफत करण्यात आलेली आहे. जम्बो कोविड सेंटर व ऑटोक्लस्टर सेंटरमध्ये रुग्णांची थेट भरती करण्यात येणार नसुन त्यासाठी मनापाच्या सर्व रुग्णालयामधून संदर्भित केलेली चिठ्ठी (Refer Chit) घेणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयातील आयुसीयुमधील गंभीर रुग्ण थेट मनपाच्या आयसीयुमध्ये दाखल करुन घेतले जाणार नाहीत. (No Transfer From Private ICU to PCMC ICU). पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील रुग्णांना पिं.चिं. मनपा रुग्णालयामध्ये प्राधान्याने भरती केले जाईल.
कोविडच्या लाटेला थोपविण्यासाठी पालिका स्तरावर समन्वयक अधिका-यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. तिस-या लाटेच्या अनुषंगाने जे रुग्ण भरती होत आहेत. त्यामध्ये लसीकरण न घेणा-यांचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी त्वरीत लसीकरण करुन घ्यावे. तसेच सर्व नागरीकांचा मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे, सॅनिटायसरचा वापर करणे इत्यादी व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.