- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२१) :- कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पोलिसांच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत .त्या अनुषंगाने ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना ‘ वर्क फ्रॉम होम ‘ देण्यात येणार आहे. त्यानुसार पिंपरी – चिंचवड शहर दलातील ४०३ पोलिसांना घरूनच काम करावे लागणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे शासनाकडून कडक निर्बंध लागू केले जात आहेत. पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे सध्या अधिकारी व कर्मचारी मिळून ३,२७५ इतके मनुष्यबळ आहे. त्यात ४०३ पोलीस ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. विविध गुन्ह्यांच्या तपासाची कागदपत्रे, अहवाल पूर्तता, आढावा आदी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.
५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ३५५ कर्मचाऱ्यांमध्ये ३०५ सहायक फौजदार (सहायक पोलीस उपनिरीक्षक) तर ५० हवालदार आहेत. वरिष्ठ पातळीवरून सूचना येतील त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल. उच्च रक्तदाब, मधुमेह, डायलिसिस आदी आजार असलेल्या तसेच इतर आजारांवर उपचार सुरू असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असे सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी सांगितले.