- म्हणाले, ”कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जबाबदारीने वागा”…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधित रुणांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे दिसताच आयसोलेट व्हावे. तातडीने चाचणी करून घ्यावी. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लक्षणे नसल्यास विलगीकरणात राहावे, असा सल्ला महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शुक्रवारी (दि. ७) शहरवासीयांना दिला आहे. कोरानाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पाटील यांनी शुक्रवारी फेसबुकच्या माध्यमातून शहरवासीयांशी संवाद साधला.
आयुक्त पाटील म्हणाले की, कोरोनाच्या महामारीविरोधात लढाई चालू आहे. १५ दिवसांपूर्वी लढाई जिंकल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सभा-समारंभ मोजक्या लोकांमध्येच करावेत. सर्वांनी मास्क वापरावा. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच चाचणी करावी. डॉक्टरांचा सल्ला घेऊन क्वारंटाईन होऊन या रोगापासू बचाव करू शकतो. क्वारंटाईन झाल्यानंतर आपल्या प्रकृतीची व्यवस्थित काळज घ्यावी. होम क्वारंटाईन असताना काही मिनिटांची वॉक टेस्ट दिवसातून दोन वेळा करावी. आक्सिजनपातळीवरील फरक लक्षात घ्यावा.
महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. चिचवडचे क्लस्टर, नेहरूनगरचे जम्बो व संत तुकारामनगरचे वायसीएम रुग्णाल सज्ज ठेवले आहे. गरज पडेल तशी वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केल जाईल. गंभीर रुग्णांसाठी व्यवस्थ केली आहे. हेल्पलाईन व कॉल सेंटर सुरू केले आहे. होम क्वारंटाईन व्यक्तीशी दररोज संभाषण करून समुपदेशन केले जाणार आहे, असे आयुक्त पाटील म्हणाले.