न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जाने.) :- महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला होता.
त्याविरोधात स्थानिक नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. याचा निर्णय आज सोमवार (दि. २८) रोजी न्यायालयाने दिला असून, बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील पुल बांधण्याचा आणि सार्वजनिक रस्त्याचा निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुलाच्या कामासाठी २०१८-१९ च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूद केली असंल्यामुळे, कामाची निविदा काढणे शक्य होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे यांनी दिली आहे.











