न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जाने.) :- निगडी येथील वाकदेवता या आंतरराष्ट्रीय माहितीपट आणि लघु चित्रपट महोत्सवात के. जी. नितीन दिग्दर्शित मोन्नोरुकम उत्कृष्ट चित्रपट ठरला, तर आशुतोष कुलकर्णी यांचा हिंदी चित्रपट ‘९४ रुपये की चाय ‘साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
“अण्णा” या चित्रपटातील भूमिकेसाठी मारिया यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. अनिल परवाकडू यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून (मथलनारंगा), तसेच उत्कृष्ट बालकलाकार बेस्टचा पुरस्कार इंद्रू आणि वेदवुक्कमसाठी अद्वैत शाईजू यांना विभागून पुरस्कार देण्यात आला. इरूल सिनेमासाठी प्रताप एन. यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार प्रदान केला. इंदिरा यू. मेनन दिग्दर्शित मराठी चित्रपट कन्यारत्न या मराठी चित्रपट श्रेणीतील स्पेशल ज्यूरी अवॉर्ड देण्यात आला.
या लघु चित्रपट महोत्सवचे उद्घाटन दाक्षिणात्य अभिनेत्री राधा यांच्या हस्ते निगडी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक संगीत शिवण, अभिनेता व प्रख्यात छायाचित्रकार राधाकृष्णन चांक्य, थरमॅक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक एम एस उन्नीकृष्णन, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे नियोजित प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, वाकदेवता फेस्टिव्हलचे स्वागताध्यक्ष एस. गणेशकुमार, वाकदेवताचे सहप्रमुख सपना व्ही. मारार, कार्याध्यक्ष हरिदास नायर, वर्ल्ड मल्याळी कौंसिलचे पुणे प्रमुख के. हरि नारायणन, चिंचवड मल्याळी समाजमचे अध्यक्ष पी. व्ही. भास्करन, सरचिटणीस टी.पी. विजयन, पुणे-केरला मुस्लिम जमातचे अध्यक्ष ए. के. झाफर, मल्याळम मिशनचे सरचिटणीस के. एस. रवि, निगडी मल्याळी समाजम अध्यक्ष रवी एन.पी, जेवियर जोसेफ, पीएनके नायर, के. विश्वनाथन नायर, पी. रवींद्रन आदी उपस्थित होते.
महोत्सवासाठी संगीत शिवान, राधा, राधाकृष्णन चक्र्य, एस. गणेश कुमार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. केरळ राज्य पुरस्कार विजेत्या ऐश्वर्या वॉरियरने ‘गणपति अनर्थ’ हि काव्यात्मक रचना सादर केली. कोझिकोडेमधील एम. शाजी यांनी “ब्लू- द कलर ऑफ मॅन” नावाची लघु नाटीका सादर केली.
सूत्रसंचालन मालविका मोहनन हिने केले तर आभार के. रंजीत यांनी मानले. यावेळी विजय किशोर यांनी “जुनी गाणी” सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिदास नायर, सपना व्ही. मारार, संगीता नंबियार, के. अरविंदशकन, श्रीनिवासन मारार, विजय किशोर यांनी विशेष परिश्रम घेतले.


















