न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जाने.) :- भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन निर्धार सभा महाआधीवेशन पिंपरीतील एच. ए. ग्राउंड येथे आज (दि. २८) रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष देवेंद्र तायडे, अरुण चाबुकस्वार व आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व जनसमुदाय उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब आबेडकर यांनी सभेस संबोधित करताना सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कारभाराचा वचपा काढला. विशेषतः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामगार धोरणास विरोध करताना, आंबेडकर म्हणाले की, महापालिकेत चतुर्थ श्रेणी कामगारांच्या नावाने ३० हजार कोटी रुपये एका ठेकेदाराला दिले जातात. पण, हा ठेकेदार त्या कामगाराला ८ हजार रुपये पगार देतो. किमान वेतनाच्या नावाने मोठा भ्रष्टाचार होत असून, त्याचा मलिदा हे सत्तापिपासू नेते वाटून घेतात. आंबेडकर यांनी विविध विषयांना हात घालून सत्ताधारी भाजपची यावेळी पोल खोल केली.
आगामी लोकसभेत भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारास विजयी करा. आम्ही खाजगीकरण बंद करू, ठेकेदारीस विरोध करून, कामगारास कायमस्वरूपी करण्यासाठी त्या पद्धतीचे धोरण राबवू, अशा आदी घोषणांचा पाऊस यावेळी आबेडकर यांनी या सभेत पाडला.











