न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २९ जाने.) :- शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख व मुळशी तालुक्याचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांचा शनिवार (दि. २६) रोजी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसासाठी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर केक कापण्यासाठी तलवार वापरली. पोलिसांच्या हाती या घटनेचा व्हिडीओ लागला असून, त्या आधारावर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.











