- तीन दिवसात साठ हजारांहून अधिकच दंड वसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ग्रिन मार्शल भरारी पथक कार्यान्वीत केले आहे. ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ग्रीन मार्शल भरारी पथकामध्ये आरोग्य निरिक्षक, लिपीक, आरोग्य सहाय्यक, एम. एस. एफ. जवान यांची नेमणुक करण्यात आली आहे.
या पथकाकडून (दि. १० ते १२) या कालावधित मास्क परिधान न करणा-या ५९ व्यक्तीकडून प्रत्येकी ५०० प्रमाणे २९,५०० रुपये तसेच अस्वच्छता व प्लास्टिक बंदीच्या उल्लंघनबाबत एकूण १६ आस्थापनांविरुद्ध केलेल्या कारवाईत ८,२५० रुपये असे एकूण ३८,०२० इतका दंड वसुल करण्यात आला आहे.
सागर कंट्री बार, पुणेरी मिळाई मॉल, जिया चिकन सेंटर, जायका चहा, तुलसी सुपर मार्केट, बारामती एग्रो, हनुमान सुपर मार्केट, नॅशनल ट्रेडर्स, सुपर चिकन, गणेश पेंटस या व्यवसायिक आस्थापनांचा यात समावेश आहे. यापुढेही ही कारवाई सुरु राहणार असून नागरिकांनी कोव्हीड १९ व स्वच्छताविषयक नियमांचे पालन करून शहरात कोव्हीड १९ चा संसर्ग रोखण्यास व शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.