- आज एक ओमायक्रोनबाधित; ७२ जण मुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. १२) रोजी २०६५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २८९९८४ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७६७०१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५२८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.
दरम्यान आज ओमायक्रोनचा १ नवीन रुग्ण आढळलेला आहे. हा रुग्ण रँन्डम तपासणीत ओमायक्रोन पाँझीटिव्ह आढळून आलेला आहे व त्यास रुग्णालयात दाखल करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. एकूण ९५ कोविड-१९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ७२ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.


















