- नऊ अधिकारी व २१ कर्मचा-यांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ३० पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी (दि. १०) समोर आले आहे. यात नऊ अधिकारी व २१ कर्मचारी आहेत.
सध्या एका पोलिसाला कोरोनाची लक्षणे दिसत असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित पोलिसांना लक्षणे दिसून येत नसून त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझर आदी सुरक्षा साधनांचा वापर करावा, अशा सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.
तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णाई यांनी २०२० मध्ये पोलीस आयुक्तालय स्तरावर पोलिसांसाठी कोरोना सेलची स्थापना केली होती. हा कोरोना सेल पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे.