- अनधिकृत १२ टपऱ्या, ४२ झोपड्या व ३२ पत्राशेडवर पालिकेचा हातोडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२२) :- प्रभाग क्र. २ बो-हाडेवाडी येथील सी. एन. जी. पम्प ते मोशी भाजी मार्केट रोड लगतच्या फुटपाथवरील १२ टपऱ्या, गोल्डन जीम परिसरातील मोकळ्या मैदानावरील ४२ झोपड्या व ३२ अनधिकृत पत्राशेडवर पालिकेच्या ‘ क ‘ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण पथकाने आज शनिवारी (दि. १५) रोजी अतिक्रमण कारवाई केली.
सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईत बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, योगेश शेवलकर, राजश्री सातळीकर, अतिक्रमण निरीक्षक ज्ञानेश्वर केळकर, सुपरवायझर पंकज वाघे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक सहभाग झाले होते.
दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टप-या व शेड उभारु नये. तसेच फुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.