- आज २३६५ कोरोना तर, तीन ओमायक्रोनबाधित; एकाचा मृत्यू; १२७४१ रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १८) रोजी २३६५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३०२३६९ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २८२३९० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५३१ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.
दरम्यान आज ओमायक्रोनचे ३ नवीन रुग्ण आढळलेले आहेत. यापैकी ०२ पुरुष व ०१ महिला आहेत. हे रुग्ण रॅण्डम तपासणीमध्ये ओमायक्रॉन बाधित आढळून आलेले असुन ३ रुग्णांची १० व्या दिवशी पुन्हा तपासणी केली असता त्याचा अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. एकूण १०८ कोविड- १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी १०३ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.











