न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२२) :- दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक विहित शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी – चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ” जे वाय ” मालिका सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी डिमांड ड्राफ्टसह २४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० दरम्यान अर्ज करावा. चारचाकी वाहन क्रमांकाची यादी २५ जानेवारी रोजी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येणार आहे.
तर, दुचाकी वाहन क्रमांकाची यादी २७ जानेवारी रोजी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. हा डिमांड ड्राफ्ट ‘ डेप्युटी आरटीओ पिंपरी चिंचवड ‘ या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतील असणे आवश्यक आहे.