- सात पीडित महिलांची सुटका; दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२२) :- डांगे चौक येथील एलेमेंट्स द फॅमिली स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यात सात पीडित महिलांची सुटका केली. आरोपी हे पीडित महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते, असे फिर्यादीत नमूद आहे.
सोमवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई केली. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग/अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षच्या पोलीस कर्मचारी संगीता जाधव यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. \
शुभांकर महेश जवाजीवार (वय २७, रा. जुना बाजार, खडकी, पुणे), रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे (वय ४३, रा. काळेवाडी फाटा, वाकड, मूळ रा. धरणगाव, जिल्हा जळगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
















