न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२२) :- चिंचवडगाव येथील चाफेकर चौक हा फेरीवाला मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. महापालिका प्रशासनाकडून फळविक्रेत्यांचे सोमवारपासून पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, या पुनर्वसनाला भाजीमंडईतील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
भाजीमंडईतील व्यापाऱ्यांनी या विरोधात मंगळवारपासून भाजी मंडईमध्ये बंद पुकारला आहे. भाजी मंडईमध्ये ४८ व्यापारी गाळे आहेत. मात्र, प्रत्यक्षात याठिकाणी ६४ व्यापारी व्यवसाय कसे व्यवसाय करतात, असा प्रश्न विचारला जात आहे. अजूनही येथील व्यापाऱ्यांनी मासिक भाडे थकवले आहे.
चिंचवड भाजीमंडर्ड ही महापालिकेच्या जागेत असल्याने याठिकाणी कोणाचे पुनर्वसन करायचे याचे अधिकार सर्व महापालिकेला आहेत. विक्रेत्यांनी विरोध करण्याचा प्रश्न येत नाही, अशी माहिती ब प्रभागाचे मुख्य क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे यांनी दिली.
















