- माहिती मिळताच पोलिसांकडून तरुणाची जेलमध्ये उचलबांगडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२२) :- हातात पालघन घेत काढलेला फोटो एका तरुणाने सोशल मीडियावर स्टेटसला ठेवला. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्या तरुणाला पालघनसह अटक केली. वेताळ नगर झोपडपट्टी, चिंचवड येथे रविवारी (दि. २३) दुपारी साडेचारच्या सुमारास ही कारवाई केली.
गणेश जगन्नाथ सुतार (वय २५, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी रोहित पिंजरकर यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सहायक निरीक्षक राजू ठुबल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश सुतार याने पालघन हातात घेऊन फोटो काढला. तसेच तो फोटो व्हॉटस्अॅपच्या स्टेट्सला ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सुतार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पालघन पोलिसांना दिले. चिंचवड पोलिसांनी आरोपी सुतार याच्यावर कारवाई केली.
















