न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२२) :- चिखली जाधववाडी मोशीमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. चिखली जाधववाडी तसेच मोशी या ग्रामीण पट्ट्यामध्ये अनेक नवीन गृह प्रकल्प नव्याने विकसित झाले आहेत. या सर्व गृह प्रकल्पामध्ये प्रजासत्ताकदिना निम्मित पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
यामध्ये प्रामुख्याने साई जीवन मनपा शाळा, अभिनव विद्यालय जाधववाडी, अंगणवाडी, विठ्ठल रुख्मिनी मंदिर, संत सावंत महाराज भाजी मंडई ,वडाचा मळा, सुभाष धायरकर मित्र मंडळ वाडा, , तसेच ऐश्वर्याम म्हाडा, इंद्रधनू सोसायटी, शंकेश्वर क्रिमसन, शंकेश्वर ड्रीम्स, मिलिनियम म्यानर, साई वस्तू पार्क, अक्षा वृंदावन, अक्षा एम्पायर अश्या विविध ठिकाणी ध्वजारोहण पार पडले.