न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२२) :- १९७१ साली आरोपीची मावस बहीण व फिर्यादीचे सासरे यांच्यात बेकायदेशीर खरेदीखत झाले. फिर्यादी यांचे दीर आणि एकाने फिर्यादी व फिर्यादी यांच्या मुलांचा त्यांच्या जमिनीवरील कायदेशीर हक्क डावलण्यासाठी व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांना कोणतीही माहिती दिली नाही.
१९७१ साली झालेल्या बेकायदेशीर खरेदीखताची शासकीय अधिका-यांच्या मदतीने १९९३ साली नोंद केली. त्यात फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच वारसांची देखील चुकीची माहिती शासन दप्तरी नोंद करून त्यांच्या वाटणीस येणारी ३६ गुंठे जमीन फिर्यादी यांच्या कुटुंबियांना न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना १९७१ ते २०१८ या कालावधीत वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे घडली. शकुंतला बाळू चिंचवडे (वय ७१, रा. चिंचवडेनगर) यांनी २५ जानेवारी २०२२ रोजी चिचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कै. बबनराव कृष्णाजी चिंचवडे, कै. पोपटराव कृष्णाजी चिंचवडे, कृष्णाबाई जयवंत काटे, जमिनीचे सध्याचे लाभार्थी सोमनाथ बबन चिंचवडे, संतोष बबन चिंचवडे, उमा दिलीप शिवळे, सीमा गोविंद जाधव, हेमा शिवाजी चौधरी, गजानन पोपटराव चिंचवडे, अश्विनी गजानन चिंचवडे तसेच त्यांना मदत करणारे व्यक्ती व संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











