न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२२) :- काळेवाडी येथील शिवाजी चौक येथे फिर्यादीचे नॅशनल ट्रेडर्स नावाचे किराणा मालाचे दुकान तसेच गोडाऊन आहे. फिर्यादीने गुरुवारी (दि. २७) रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान व गोडाऊन बंद केले.
त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकटून तीन लाख १३ हजार ४०९ रुपये किमतीचा किराणा माल व फिर्यादीच्या खात्यामधील ट्रांजेक्शनद्वारे ८० हजार रुपये, असा एकूण तीन लाख ९३ हजार ४०९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
हा प्रकार शुक्रवारी (दि. २८) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला. सुजाराम वेनाराम सिरवी (वय ३८, रा. विजय नगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












