- आज २१३३ कोरोनाबाधित; पाच जणांचा मृत्यू; ४३६९ रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. ३०) रोजी २१३३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४३६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३४६९८६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३२३६८० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५६३ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०५ एवढी आहे.














