- महिलेला दिली खुनाची धमकी; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२२) :- महिलेवर लैंगिक अत्याचार करीत याबाबत कोणाला सांगितल्यास खून करण्याची धमकी दिली. हा प्रकार काळेवाडी येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
त्यानुसार कैलास पांचाराम जांगीड (वय ४४, रा. प्रेमलोक कॉलनी, नढे नगर, काळेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने फिर्यादीच्या पतीला विश्वासात घेतले. त्यानंतर तो आजारी असल्याचा बहाणा करून फिर्यादीला आपल्या घरी भांडी घासण्यासाठी बोलविले.
तसेच फिर्यादीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास ” मी तुझा खून करेन ” अशी धमकी दिली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.














