- पिंपरीतील घटना; आरोपीला पोलिसांकडून बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२२) :- शिवीगाळ व मारहाण करीत एकाकडील रोकड लुटण्यात आली. तसेच कोयता व रॉडने वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी दिलीप मच्छिंद्र थोरात (रा. युगांतर चौक, भीमनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हेमंत मनोज लखन (वय २४) याला पोलिसांनी अटक केली असून, राहुल मनोज लखन (वय २१, दोघेही रा. भाजी मंडईजवळ, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल आहे.
शुक्रवारी (दि. २८) रात्री साडे अकराच्या सुमारास फिर्यादी हे एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या शेजारील रोडवर टेम्पो उभा करून उतरले असता, हेमंत व मनोज त्यांच्याजवळ आले. हेमंतने कोयत्याने तर राहुलने रॉडने फिर्यादीच्या टेम्पोवर मारले. फिर्यादीला शिवीगाळ करीत त्यांच्या खिशातील अकराशे रुपयांची रोकड लुटली. तेथील एका दुचाकीचेही नुकसान करून आरडाओरडा केला.














